गणेशोत्सवादरम्यान सोसायटी स्तरावर पपेट शो सादर
Event Details
गणेशोत्सवादरम्यान सोसायटी स्तरावर पपेट शो सादर
टाइम्स ग्रीन गणेशा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन यांच्यातर्फे गणेशोत्सवामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सोसायट्यांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकविषयी जनजागृतीपर पपेट शो सादर करण्यात आले. याअंतर्गत सुवर्णयुग लोक (औंध), पूर्वा रेसिडेन्सी (पिंपळे सौदागर), साई प्लॅटिनम (पिंपळे सौदागर), तुषार रेसिडेन्सी (पिंपळे सौदागर) आणि सन एम्पायर (सिंहगड रोड) या सोसायट्यांमध्ये पपेट शो आयोजित केले होते. 'रागिणी पपेट शो' मार्फत सौ. रागिणी सोमण व श्री. राजेंद्र सोमण यांनी अतिशय मनोरंजक पद्धतीने हे खेळ सादर करून प्लास्टिकविषयी आवश्यक जनजागृती केली. सोसायट्यांकडूनही या 'पपेट शो' ला चांगला प्रतिसाद मिळाला.