green survey

green survey


Event Details

सर्व पुणेकरांना नमस्कार , 
एम. इ. एस. सिनियर कॉलेज आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्रीन कॅम्पस सर्व्हे" हा उपक्रम २२० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने राबविला जाणार आहे. 
या सर्व्हेमध्ये आपण सोसायटी, शाळा आणि कॉलेज याच्या आजूबाजूचा परिसर (कॅम्पस) यात राबविले जाणारे पर्यावरण पूरक उपक्रम तसेच उपकरणांची माहिती गोळा करण्याचे काम होणार आहे. या माहितीच्या आधारे पूर्ण पुणे शहरात पर्यावरण संवर्धन तसेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने काय पाऊलं उचलली जात आहेत आणि त्यादृष्टीने अजून काय करता येऊ शकेल याचा आढावा मिळणार आहे. यातून आपल्या शहराला भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखून 'स्मार्ट सिटी'कडे वाटचाल व्हायला मदतच होईल.
 तरी सर्व पुणेकरांना आम्ही विनंती करतो की आलेल्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या कॅम्पसची संपूर्ण माहिती देऊन  सहकार्य करावे.