पर्यावरणास आणि आरोग्यास घातक असलेल्या इ-कचऱ्यापासून मुक्ती मिळविण्याच्या दिशेने सांगलीकरांनी स्वातंत्र्य दिनी पहिले पाऊल टाकले. विविध संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल सात टन इ-कचरा संकलित करण्यात आला. महापालिका आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आयोजित समितीने मोहीम राबविली.
सहभागी संस्था आणि व्यक्ती: जीवन विद्या मिशन, रॉबिन हूड आर्मी, निसर्ग संवाद आभाळमाया, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी, रोहन कोठारी, सौरभ मराठे, प्रदीप कुलकर्णी, डॉ. शर्वरी सोलापुरे, प्रणिता हेरवाडे-कुंभोजकर, डॉ. भाग्यश्री वाटवे, हिमांशू लेले, श्रीपाद कुलकर्णी, सुधीर गोरे, तासगावहून दिलीपराव जोगळेकर, शंतनू जोगळेकर, विलास भिसे, आशिष किंकर, महेश सुतार, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, डॉ. मनोज पाटील, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, डॉ. दिलीप पटवर्धन, नाशिकचे राजेंद्र जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.