'पूर्णम' ने जिल्ह्यातून केला साडे सहा टन इ-कचरा गोळा
पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून "शुभस्य शीघ्रम' या उक्तीप्रमाणे सांगली, इचलकरंजी, तासगाव, इस्लामपूर, पलूस येथून सुमारे साडे सहा टन इ-कचरा संकलित केला. त्यांचे हे कार्य गेली ९ वर्षे अव्याहतपणे सुरु आहे.