गणेशोत्सव कसा साजरा करावा? 


१ गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक हवी.

२. सजावट रोपे, कागद, कपड्याच्या साहायाने तयार केलेली असावी.
४ सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळावा.
५ गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी.
६ श्रींचे विसर्जन घरामध्ये करा आणि माती रिसायकलिंगसाठी दान करा.
७ निर्माल्य हे वाहत्या पाण्यात सोडून नदी दूषित न करता त्याच निर्मल्यापासून कंपोस्ट खत तयार करावे.
८. महानगरपालिकेने तयार केलेल्या हौदाचा आणि निर्माल्य कलशाचा वापर करा.

 

गोमय गणेश
पूर्ण शास्त्रीय पद्धतीने बनवलेली 9 इंच उंची असलेली माती व देशी गायीच्या गोमय यांचा वापर करुन बनवलेली पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बूक करण्यासाठी ९२२५५००९९७५ किंवा ९९७५०२७१७३ या नंबरवर संपर्क साधा.


 

निर्माल्य अगरबत्ती
कामधेनु बचत गटाने निर्माल्यापासून बनविलेली अगरबत्ती हवी असल्यास ९३५४६३२९७५ या नंबरवर संपर्क साधा. श्रीकृष्ण, पंचयाग आणि सप्तचिरंजीव तीन सिरीजमध्ये २० प्रकारच्या सुगंधांत अगरबत्ती उपलब्ध आहेत. पुणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागांमधील मंदिरांमधून जमा केलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती आणि धूप बनविण्याचा हा प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने कमिन्स इंडिया फाउंडेशन, थम क्रिएटीव्ह आणि पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशन या संस्थांद्वारे राबविला जातो.    

 

Date
Banner Image
इकोफ्रेंडली गणेशोत्सव
Collection Points Applicable
Yes
487
489
Process Section (Heading)
The Process
Process Section (Description)
इकोफ्रेंडली गणेशोत्सवांतर्गत दोन उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यापैकी पहिला म्हणजे उत्सवादरम्यान निर्माण झालेले निर्माल्य दिनांक ५ आणि ९ सप्टेंबर रोजी संकलित केले जाणार आहे. थम क्रिएटीव्ह आणि जनवाणी या संस्थाद्वारे हे संकलन केले जाणार आहे. संकलन केंद्रांची यादी याच संकेतस्थळावर खाली दिलेली आहे.

दुसरा उपक्रम म्हणजे श्रींच्या मूर्त्यांचे घरच्या घरी विसर्जन केल्यास ती माती पुनरावर्तनद्वारे संकलित केली जाणार आहे. तुम्ही दिनांक ४ आणि दिनांक ११ सप्टेंबर या दोन दिवशी संकलन केंद्रांवर माती आणून देऊ शकता. संकलन केंद्रांच्या माहितीसाठी https://punaravartan.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.

Place
Pune City
What Is Section (Event Title)
इकोफ्रेंडली गणेशोत्सव
What Is Section (Event Description)
गणपती उत्सवाची तयारी सर्व घरांमध्ये सुरू आहे. पूर्वीच्या उत्सवाच्या संकल्पनेनुसार घरोघरी स्थानिक मातीच्या मूर्तींची स्थापना व्हायची आणि आरास ही नैसर्गिक वस्तूंपासून तयार व्हायची. हाच उद्देश्य ठेवून पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील विविध सामाजिक संस्थांमार्फत "पर्यावरण पूरक गणेशोत्सव" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उत्सवाला पर्यावरण पूरक बनविण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्नशील राहूया.
Event Time
All day
End Date