आंतरशालेय स्पर्धेची अंतिम फेरी उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, ता. १५ :
महानगरपालिका, सीएसएन फर्स्ट आणि पूर्णम ईकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'बेस्ट आउट ऑफ ई-वेस्ट' या आंतरशालेय स्पर्धेची अंतिम फेरी आणि प्रकल्प प्रदर्शन रविवारी (ता. १५) क्लोवर डेल स्कूल, एमजीएम कॅम्पस येथे उत्साहात पार पडले. अंतिम फेरीत शहरातील ३५ शाळांमधील सुमारे २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत १२० नावीन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले.
अंतिम फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी ई-कचऱ्याचा पुनर्वापर करून उपयुक्त आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर, ऊर्जा संवर्धन, स्वच्छता आणि पुनर्वापर यांसारख्या संकल्पनांवर आधारित विविध कल्पना पाहायला मिळाल्या. यावेळी सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा, महानगरपालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त अंकुश पांढरे, सीएसएन फर्स्टचे मानद सचिव हबीब शेख, कार्यकारी सदस्य गुरप्रीतसिंग बग्गा, दुष्यंत पाटील तसेच पूर्णम ईकोव्हिजन फाउंडेशनचे व्यवस्थापक सुभाष अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मनपा शिक्षण विभागाचे उपायुक्त अंकुश पांढरे म्हणाले, की ई-कचरा ही भविष्यातील एक गंभीर समस्या ठरणार आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने उपयुक्त उपाय शोधणे आवश्यक आहे. या संशोधनाचा समाजासाठी उपयोग व्हावा.
सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष रितेश मिश्रा यांनी सांगितले, की आज सादर झालेल्या अनेक प्रकल्पांमध्ये अभियांत्रिकी संशोधनाची बीजे दिसून येतात. विद्यार्थ्यांच्या या कल्पनांना पुढे नेण्यासाठी सीएसएन फर्स्ट मदत करणार आहे. स्पर्धेचे परीक्षण डॉ. आर.एम. दमगिरे, डॉ. दीपक बोरणारे, आर्किटेक्ट बाबासाहेब म्हस्के, ए.बी. देशमुख, मिलिंद देशपांडे, प्रिया बेंडारकर, डॉ. जी.जे. सोहनी आणि सुभाष अंभोरे यांनी केले.
उच्च माध्यमिक गट (आठवी ते दहावी)
| माध्यमिक गट (पाचवी ते सातवी)
|
